Tuesday, March 29, 2011

बोगांडा दिन - मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक.
युवा दिन - तैवान.
१७९२ - स्वीडनचा राजा गुस्ताव तिसर्‍याचा मृत्यू. गुस्ताव चौथा एडोल्फ राजेपदी.
१८०९ - स्वीडनमध्ये राजा गुस्ताव चौथ्या एडोल्फविरुद्ध उठाव. स्वीडनचा भाग असलेल्या फिनलंडने रशियाशी संधान बांधले.
१८४७ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - जनरल विनफील्ड स्कॉटच्या नेतृत्त्वाखाली अमेरिकेच्या सैन्याने व्हेराक्रुझ शहर जिंकले.
१८४९ - ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने पंजाब खालसा केले.
१८५७ - मंगल पांडे या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकार्‍यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो.
१८८२ - नाइट्स ऑफ कोलंबस या संस्थेची स्थापना.
१९२९ - सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता उत्पल दत्त यांचा जन्म. (मृत्यु:१९९३)
१९३६ - जर्मनीत एडॉल्फ हिटलरने जनतेकडे र्‍हाइनलँड बळकावण्यासाठी कौल मागितला. याला ९९.५% मतदारांनी उजवा कौल दिला.
१९६२ - भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलिन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे अनावरण झाले.
१९७१ - व्हिएतनाम युद्ध-माय लाईची कत्तल - निरपराध व निःशस्त्र नागरिकांची हत्या करणार्‍या अमेरिकन सैनिक लेफ्टनंट विल्यम कॅलीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
१९७३ - व्हिएतनाम युद्ध - शेवटच्या अमेरिकन सैनिकांनी दक्षिण व्हिएतनाममधून माघार घेतली.
१९८२ - एन.टी. रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली.
२००३ - बल्गेरिया, एस्टोनिया, लाटव्हिया, लिथुएनिया, रोमेनिया, स्लोव्हाकिया व स्लोव्हेनियाला 'नाटो'चे सभासदत्त्व.

No comments:

Post a Comment