Tuesday, March 8, 2011

१६१८ - योहान्स केप्लरने ग्रहभ्रमणाचा तिसरा नियम शोधला.
१९११ - आंतरराष्ट्रीय महिला दिन पहिल्यांदा मानला गेला.
१९१८ - जुन्या पिढीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती गोवर्धन पारीख यांचा जन्म.एम.एन.रॉय यांच्या 'Radical Humanist' चळवळीतील अग्रणी,'स्त्री हितकारीणी'च्या संस्थापिका आणि विचारवंत   म्हणूनही त्या सर्वपरिचित होत्या.
१९३० - प्रसिद्ध कवी,लेखक व नाटककार चिं.त्र्यं.खानोलकर यांचा जन्म.'आरती प्रभू' या नावाने त्यांनी काव्यलेखन केले.
१९४८ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की सरकारी शाळांमधून धर्माचे शिक्षण देणे अमेरिकेच्या संविधानाच्या विरुद्ध आहे.
             महाराष्ट्रातील फलटण हे संस्थान भारतीय गणराज्यात सामील झाले.
१९५० - सोवियेत संघाने आपल्याकडे अणुबॉम्ब असल्याचे जाहीर केले.
२००२ - कर्नाटक संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायक आणि व्हायोलिनवादक डॉ.एम.बालमुरलीकृष्णन यांना एस.व्ही.नारायणस्वामी राव स्मृती राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
२००४ - 'लिक्विड क्रिस्टल' संबंधीच्या संशोधनाचे प्रणेते प्रा.एस.चंद्रशेखर यांचे निधन.बंगळूरमध्ये 'सेंटर फॉर  लिक्विड क्रिस्टल रिसर्च' या संस्थेच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
२००८ - भारताचा Grand  master विश्वनाथन आनंद याने मोरेलिया-लिनारेस बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. 

No comments:

Post a Comment