Monday, March 28, 2011

८४५ - व्हायकिंग सरदार राग्नार लोडब्रोकने पॅरिस शहर लुटले.
१७७६ - हुआन बॉतिस्ता दि आन्झाने सान फ्रांसिस्कोचा किल्ला बांधायला सुरुवात केली.
१८५४ - क्रिमियन युद्ध - फ्रांसने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१८६८ - रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की याचा जन्म.
१९३० - तुर्कस्तानमधील कॉँस्टेन्टिनोपल व अंगोरा शहरांनी आपली नावे बदलून अनुक्रमे इस्तंबूल व अंकारा अशी ठेवली.
१९६९ - अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवर, यांचा मृत्यू.
१९७९ - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील थ्री माइल आयलंड अणुशक्ती केंद्रातील शीतक बंद पडला व त्यामुळे किरणोत्सर्गी पाणी वाफरुपे हवेतून पसरले.
१९७९ - युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान जेम्स कॅलाहान विरुद्ध अविश्वासाचा ठराव एका मताने मान्य झाल्यावर सरकार कोसळले व संसद विसर्जित केली गेली.
१९९२ - भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे. आर. डी. टाटा यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
१९९७ -  सामाजिक कार्यकर्ता, भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या श्रीमती पुपुल जयकर,यांचा मृत्यू.
१९९८ - सी-डॅक ने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.
२००५ - सुमात्रा बेटावर रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.७ तीव्रतेचा भूकंप.
२००८ - भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३०९ धावांची नाबाद खेळी केली व सर डॉन ब्रॅडमन व ब्रायन लारानंतर दोन त्रिशतके फटकावणारा तिसरा फलंदाज झाला. चार वर्षांपूर्वी मार्च २९ला सेहवागने पाकिस्तानविरुद्ध त्रिशतकी खेळी केली होती.

No comments:

Post a Comment