Thursday, March 24, 2011

८०९ - बगदादचा खलिफा हरून-अल- रशीद याचा मृत्यू.
१८३७ - कॅनडाने आफ्रिकन कॅनडियन  नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला.
१८५५ - आग्रा आणि कलकत्तादरम्यान तारसेवा सुरु झाली. 
१८९६ - ए.ए.पोपोव्ह याने इतिहासातील पहिला रेडियो ट्रान्समिशन सिग्नल पाठवला.
१९०५ - फ्रेंच लेखक ज्युल्स व्हर्न याचा मृत्यू.
१९२३ - 'ग्रीस' देश 'रिपब्लिक' बनला.
१९९७ - कागद कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यातून 'लिग्निन' हा पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेला घटक दूर करण्याचे तंत्र शोधण्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) संशोधकांना यश आले.
१९९८ - खर्च आणि उत्पन्नाच्या बाबतीत नवे उच्चांक स्थापित करणाऱ्या 'टायटॅनिक' या चित्रपटाने अकरा ऑस्कर पारितोषिके मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला.
१९९९ - कोसोव्हो युद्ध-'नाटो' सैन्याने युगोस्लावियावर बॉम्बफेक केली. कोणत्याही स्वतंत्र राष्ट्रावर 'नाटो' ने हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ होती.
२००८ - पहिल्या जाहीर निवडणुका घेऊन 'भूतान' हे अधिकृत लोकशाही राष्ट्र बनले.

No comments:

Post a Comment