Wednesday, April 27, 2011

१५२१ - माक्टानची लढाई - पृथ्वीप्रदक्षिणा करणारा फर्डिनांड मॅगेलन फिलिपाईन्समध्ये स्थानिक रहिवाश्यांशी लढताना मृत्युमुखी.
१६६७ - अंध व हलाखीत दिवस काढणार्‍या जॉन मिल्टनने आपले महाकाव्य 'पॅरेडाईझ लॉस्ट' १० ब्रिटीश पाउंडला विकले.
१७७३ - भारतातील युद्धांच्या खर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीला वाचवण्यासाठी ब्रिटीश संसदेने 'टी ऍक्ट' करून कंपनीला उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.
१८१० - बीथोव्हेनने आपले प्रसिद्ध पियानो संगीत 'फ्युर एलिझ' रचले.
१८६१ - अब्राहम लिंकनने अमेरिकेत हेबिअस कोर्पसचा मूलभूत हक्क निलंबित केला. यामुळे सरकारला कोणासही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकण्यास मोकळीक मिळाली.
१९०८ - लंडनमध्ये चौथे ऑलिंपिक खेळ सुरू.
१९५० - दक्षिण आफ्रिकेत वंशभेद अधिकृत करणारा कायदा मंजूर झाला.
१९६० - टोगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
१९६१ - सियेरा लिओनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
१९८१ - झेरॉक्स पार्कने 'माउस' वापरण्यास सुरुवात केली.
१९९२ - सर्बिया व मॉन्टेनिग्रोने एकत्र येउन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकची स्थापना केली.
१९९४ - दक्षिण आफ्रिकेत निवडणुका. श्यामवर्णीय व्यक्तिंना मतदान करण्यास प्रथमतः मुभा.
२००५ - एअरबसने आपले ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक दाखवले.

Monday, April 25, 2011

 इटलीचा स्वातंत्र्य दिन-फेस्ता देला लिबरेझियोन.
१६०७ - ८० वर्षांचे युद्ध - नेदरलँड्सने जिब्राल्टरजवळ स्पेनचे आरमार बुडवले.
१७४० - श्रीमंत  थोरले बाजीराव पेशवे यांचा मृत्यू.
१७९२ - क्लॉड जोसेफ रूगे दि लिलने फ्रेंच राष्ट्रगीत 'ला मार्सेल'ची रचना केली.
१८४६ - मेक्सिको व टेक्सासच्या प्रजासत्ताक मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी सुरू.
१८५९ - सुएझ कालव्याची पायाभरणी.
१८७४ - रेडियोचा शोध लावणारे शास्त्रज्ञ मार्कोनी यांचा जन्म.
१९२६ -  इराणमध्ये रझा शाह पहलवी सत्तेवर.
१९५४ - जगातल्या सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पाय ठेवणारी पहिली भारतीय महिला बचेंद्री पाल हिचा जन्म.
१९७४ - पोर्तुगालमध्ये जनतेचा उठाव. लोकशाही पुन्हा अमलात.
१९८३ - अंतराळयान 'पायोनियर १०' सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.
२००० - वादग्रस्त अलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत(सध्या ५०९ मीटर)वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला परवानगी दिली.

Thursday, April 21, 2011

इ.स.पू. ७५३ - रोम्युलसने रोम शहराच्या उभारणीस सुरुवात केली.
१७९२ - ब्राझिलचा स्वातंत्र्यसेनानी तिरादेन्तेसचा वध.
१९१० - सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन, याचा मृत्यू.
१९४४ -  फ्रान्समध्ये स्त्रियांना मताधिकार प्राप्त.
१९६० - ब्राझिलची राजधानी रियो दि जानेरोहून ब्राझिलियाला हलवण्यात आली.
१९६६ - इथियोपियाच्या 'हेल सिलासी'चे जमैकात आगमन.'रासतफारी' पंथातील एक महत्त्वाची घटना.
१९८९ - चीनची राजधानी बैजिंगच्या तिएनानमन चौकात १,००,००० विद्यार्थी जमण्यास सुरुवात झाली.
१९९७ - भारतीय पंतप्रधान म्हणून इंद्रकुमार गुजराल यांचा शपथविधी.
२००० - आई-वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही हक्क.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल.

Friday, April 15, 2011

जागतिक विशेष ग्रंथपाल दिन.
१४५२ - चित्रकार,शिल्पकार,शरीरशास्त्रज्ञ,लष्करी अभियंता,नगररचनाकार,भूगर्भशास्त्रज्ञ अशा विविध गुणांनी सर्वश्रेष्ठ असणारा कलावंत लिओनार्दो दा व्हिंची याचा इटली येथे जन्म.इ.स.१५०० मध्ये त्याने काढलेले अजरामर चित्र 'मोनालिसा' जगप्रसिद्ध आहे.
१९३२ - मराठी साहित्यात 'गझल'ला अजरामर करणारे  कवी व गझलकार सुरेश भट, यांचा जन्म.
१९८० - नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञ ज्याँ-पॉल सार्त्र, याचा मृत्यू.
१९८५ - कॉलरा या रोगावर संशोधन करणारे वैद्यकीय संशोधक डॉ.शंभुनाथ डे यांचे कोलकाता येथे निधन.
२००४ - भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट कसोटी सामन्यात तब्बल १२ तास फलंदाजी करून ३४ चौकार आणि एक षटकारासह २७० धावांची खेळी करणाऱ्या राहुल द्रविडने पाचवे कसोटी द्विशतक झळकावले.अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.
२००८ - पूर्व बंगाल(बांगलादेश)आणि पश्चिम बंगाल यांना जोडणारी प्रवासी रेल्वे तब्बल ४३ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा धावू लागली.परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी कोलकाता ते ढाका 'मैत्री एक्स्प्रेस'ला हिरवा झेंडा दाखवला.  

Thursday, April 14, 2011

१८२८ - नोआह वेब्स्टरने 'डिक्शनरी'चा कॉपीराईट नोंदवला.
१८६५ - जॉन विल्कस बूथने अब्राहम लिंकनवर गोळी झाडली. लिंकन दुसर्‍या दिवशी मृत्यू पावला.
१८६६ - हेलन केलरची शिक्षिका ऍन सुलिव्हान, हिचा जन्म.
१८९१ -  भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार,अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांचा जन्म.
१९१२ - आर.एम.एस. टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर. बोटीला भगदाड पडून बुडु लागली.
१९१५ - तुर्कस्तानने आर्मेनियावर आक्रमण केले.
१९३१ - स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने राजा अल्फान्सो तेराव्याची हकालपट्टी केली व दुसरे स्पॅनिश प्रजासत्ताक अस्तित्त्वात आल्याचे जाहीर केले.
१९४४ - मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या बोटीवर महाभयानक विस्फोट. ३०० ठार. त्याकाळच्या २ कोटी पाउंडचे नुकसान.
१९६२ -  प्रख्यात  भारतीय अभियंता सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया,यांचे निधन.खडकवासला धरण,म्हैसूरचे कृष्णराजसागर धरण वगैरेंच्या उभारणीत त्यांचा मोठा वाट होता.
१९८६ - बांगलादेशमध्ये १ किलो वजनाच्या अतिप्रचंड गारांचा वर्षाव. ९२ ठार. गारांच्या वजनाचा हा विक्रम अजुन अबाधित आहे.

Tuesday, April 12, 2011

जागतिक जलस्रोत दिन.
इ.स.पू. ४९९ -  जैन धर्मसंस्थापक वर्धमान महावीर यांचा जन्म.
१६०६ - ग्रेट ब्रिटनने 'युनियन जॅक'ला आपला अधिकृत ध्वज म्हणून मान्यता दिली.
१९४५ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट यांचा अध्यक्षपदी असताना मृत्यु. उपाध्यक्ष हॅरी ट्रुमन यांची राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक.
१९६१ - मेजर युरी गागारीन या मानवासह 'व्होस्टोक-१' या रशियन अंतराळ यानाने पृथ्वी प्रदक्षिणा केली. पृथ्वी प्रदक्षिणा करून अंतराळभ्रमण करणारा युरी गागारीन हा पहिला मानव ठरला.
१९८१ - स्पेस शटल कार्यक्रमात 'कोलंबिया'या शटलने अवकाशात यशस्वी झेप घेतली.
१९९८ - देशात साठच्या दशकात हरितक्रांती घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावणारे सी.सुब्रह्मण्यम यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मान प्रदान.
१९९४  - 'यूझनेट' वर सर्वप्रथम व्यापारिक 'स्पॅम ईमेल' पाठवण्यात आली.
१९९७ - भारतीय पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा राजीनामा.
२००१ - हॉंगकॉंग येथे जगातील सर्वात मोठे विमानतळ.
२००४ - वेस्ट इंडीजचा कर्णधार ब्रायन लारा याने इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात नाबाद ४०० धावा केल्या.

Thursday, April 7, 2011

जागतिक आरोग्य दिन.
१७७० - सुप्रसिद्ध इंग्लिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ, याचा जन्म.
१८२७ - जॉन वॉकर या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ्याने आपली पहिली 'घर्षण काडेपेटी' विकली. त्याने आदल्या वर्षी हिचा शोध लावला होता.
१९२० - 'भारतरत्न या सर्वोच्च गौरवाने सन्मानित झालेले विख्यात सतारवादक पं.रवी शंकर यांचा जन्म.
१९४६ - सिरीया फ्रान्सपासून औपचारिक रित्या स्वतंत्र झाला. 
१९४८ - संयुक्त राष्ट्रासंघाद्वारे (युनायटेड नेशन्स) 'जागतिक आरोग्य संघटने'ची स्थापना.
१९५४ - अमेरिकेचे अध्यक्ष डी. आयसेनहॉवर यांनी जगप्रसिद्ध 'डॉमिनो थिअरी' मांडली.
१९६४ - आय.बी.एम.(I .B.M .) ने 'सिस्टीम/३६०' (system /360)ची घोषणा केली.
२००१ - 'मार्स ओडिसी' हे अवकाशयान फ्लोरिडा येथील केप कॅनव्हेराल अवकाश स्थानावरून मंगळाकडे झेपावले.
२००३ - अमेरिकेच्या सैन्याने बगदाद काबीज केले.सद्दाम हुसेनचे सरकार पडले.

Tuesday, April 5, 2011

राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन.
१६६३ - पुण्याच्या लालमहालात तळ देऊन राहिलेल्या शाहिस्तेखानावर शिवाजी महाराजांनी अकस्मात हल्ला चढवला.या हल्ल्यात शाहिस्तेखान वाचला.परंतु त्याची बोटे छाटली गेली.
१८७९ - चिलीने बोलिव्हिया व पेरू या देशांविरुद्ध युद्ध पुकारले.हे युद्ध 'पॅसिफिकचे युद्ध म्हणून ओळखले जाते.
१९२७ - मराठी नवकथांचे प्रवर्तक,निसर्ग अभ्यासक,उत्तम चित्रकार आणि ग्रामीण जीवनावर स्वतःच्या स्वतंत्र शैलीत कथा लिहिणारे ज्येष्ठ लेखक व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म.
१९३० - साबरमतीहून १२ मार्च रोजी निघालेले महात्मा गांधी व त्यांचे सहकारी पंचवीस दिवसांच्या पद्यात्रेनंतर दांडी येथे पोहोचले व त्यांनी बंदी हुकुम मोडून मीठ तयार केले.या सत्याग्रहाला देशभर प्रचंड प्रतिसाद मिळाला.  
१९५५ - विन्स्टन चर्चिल यांनी खालावणाऱ्या प्रकृतीमुळे ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
१९५६ - फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबाच्या राष्ट्राध्यक्षाविरुद्ध युद्ध पुकारले.
१९६७ - केरळ मधील पहिली सार्वत्रिक निवडणूक कम्युनिस्टांनी जिंकली.इ.एम.एस.नम्बुद्रीपाद प्रथम मुख्यमंत्री. 
२००० - डीडी-१० या मराठी उपग्रह वाहिनीचे 'सह्याद्री' असे नामकरण ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनाबाई यांच्या हस्ते करण्यात आले.