Friday, April 15, 2011

जागतिक विशेष ग्रंथपाल दिन.
१४५२ - चित्रकार,शिल्पकार,शरीरशास्त्रज्ञ,लष्करी अभियंता,नगररचनाकार,भूगर्भशास्त्रज्ञ अशा विविध गुणांनी सर्वश्रेष्ठ असणारा कलावंत लिओनार्दो दा व्हिंची याचा इटली येथे जन्म.इ.स.१५०० मध्ये त्याने काढलेले अजरामर चित्र 'मोनालिसा' जगप्रसिद्ध आहे.
१९३२ - मराठी साहित्यात 'गझल'ला अजरामर करणारे  कवी व गझलकार सुरेश भट, यांचा जन्म.
१९८० - नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञ ज्याँ-पॉल सार्त्र, याचा मृत्यू.
१९८५ - कॉलरा या रोगावर संशोधन करणारे वैद्यकीय संशोधक डॉ.शंभुनाथ डे यांचे कोलकाता येथे निधन.
२००४ - भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट कसोटी सामन्यात तब्बल १२ तास फलंदाजी करून ३४ चौकार आणि एक षटकारासह २७० धावांची खेळी करणाऱ्या राहुल द्रविडने पाचवे कसोटी द्विशतक झळकावले.अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.
२००८ - पूर्व बंगाल(बांगलादेश)आणि पश्चिम बंगाल यांना जोडणारी प्रवासी रेल्वे तब्बल ४३ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा धावू लागली.परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी कोलकाता ते ढाका 'मैत्री एक्स्प्रेस'ला हिरवा झेंडा दाखवला.  

1 comment:

  1. ब्रह्मांडनायक सचिन तेंडुलकर यांचे T20 मधले पहीले शतक. :-D

    ReplyDelete