Tuesday, April 5, 2011

राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन.
१६६३ - पुण्याच्या लालमहालात तळ देऊन राहिलेल्या शाहिस्तेखानावर शिवाजी महाराजांनी अकस्मात हल्ला चढवला.या हल्ल्यात शाहिस्तेखान वाचला.परंतु त्याची बोटे छाटली गेली.
१८७९ - चिलीने बोलिव्हिया व पेरू या देशांविरुद्ध युद्ध पुकारले.हे युद्ध 'पॅसिफिकचे युद्ध म्हणून ओळखले जाते.
१९२७ - मराठी नवकथांचे प्रवर्तक,निसर्ग अभ्यासक,उत्तम चित्रकार आणि ग्रामीण जीवनावर स्वतःच्या स्वतंत्र शैलीत कथा लिहिणारे ज्येष्ठ लेखक व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म.
१९३० - साबरमतीहून १२ मार्च रोजी निघालेले महात्मा गांधी व त्यांचे सहकारी पंचवीस दिवसांच्या पद्यात्रेनंतर दांडी येथे पोहोचले व त्यांनी बंदी हुकुम मोडून मीठ तयार केले.या सत्याग्रहाला देशभर प्रचंड प्रतिसाद मिळाला.  
१९५५ - विन्स्टन चर्चिल यांनी खालावणाऱ्या प्रकृतीमुळे ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
१९५६ - फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबाच्या राष्ट्राध्यक्षाविरुद्ध युद्ध पुकारले.
१९६७ - केरळ मधील पहिली सार्वत्रिक निवडणूक कम्युनिस्टांनी जिंकली.इ.एम.एस.नम्बुद्रीपाद प्रथम मुख्यमंत्री. 
२००० - डीडी-१० या मराठी उपग्रह वाहिनीचे 'सह्याद्री' असे नामकरण ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनाबाई यांच्या हस्ते करण्यात आले.

No comments:

Post a Comment