Thursday, April 14, 2011

१८२८ - नोआह वेब्स्टरने 'डिक्शनरी'चा कॉपीराईट नोंदवला.
१८६५ - जॉन विल्कस बूथने अब्राहम लिंकनवर गोळी झाडली. लिंकन दुसर्‍या दिवशी मृत्यू पावला.
१८६६ - हेलन केलरची शिक्षिका ऍन सुलिव्हान, हिचा जन्म.
१८९१ -  भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार,अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांचा जन्म.
१९१२ - आर.एम.एस. टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर. बोटीला भगदाड पडून बुडु लागली.
१९१५ - तुर्कस्तानने आर्मेनियावर आक्रमण केले.
१९३१ - स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने राजा अल्फान्सो तेराव्याची हकालपट्टी केली व दुसरे स्पॅनिश प्रजासत्ताक अस्तित्त्वात आल्याचे जाहीर केले.
१९४४ - मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या बोटीवर महाभयानक विस्फोट. ३०० ठार. त्याकाळच्या २ कोटी पाउंडचे नुकसान.
१९६२ -  प्रख्यात  भारतीय अभियंता सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया,यांचे निधन.खडकवासला धरण,म्हैसूरचे कृष्णराजसागर धरण वगैरेंच्या उभारणीत त्यांचा मोठा वाट होता.
१९८६ - बांगलादेशमध्ये १ किलो वजनाच्या अतिप्रचंड गारांचा वर्षाव. ९२ ठार. गारांच्या वजनाचा हा विक्रम अजुन अबाधित आहे.

No comments:

Post a Comment