Tuesday, July 19, 2011


१९३८ - खगोलशास्त्रज्ञ व खगोलभौतिकी क्षेत्रांतील शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म.
१९९३ - ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्याच्या कार्याबद्दल डॉ. बानू कोयाजी यांना 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार' जाहीर.
२००५ - देशातील दूरसंचार क्रांतीचे शिल्पकार सॅम पित्रोडा यांना 'लोकमान्य टिळक पुरस्कार' जाहीर.
२०१० - 'ब्लॅक बॉक्स'  चे जनक, संशोधक डॉ. डेव्हिड वॉरेन यांचे निधन.

Wednesday, July 13, 2011

१६६० - आदिलशाही  फौजा घोडखिंडीत रोखून धरून बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राणार्पण केले.
१७६२ - इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ जेम्स ब्रॅडली यांचे निधन.
१८९६ - बेन्झीन रेणूच्या संरचनेचा जनक, जर्मनीचे प्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञ फेड्रिक केकुल यांचे निधन.
१९२४ - अर्थशास्त्रज्ञ आल्फ्रेड मार्शल यांचे निधन.
१९६९ - महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद यांचे निधन.
२००४ - ऑस्ट्रेलियाचा अव्वल लेगस्पिनर शेन वॉर्नने मुथय्या मुरलीधरनच्या ५२७ बळींच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी केली.  

Friday, July 8, 2011

१९१० - स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्सेलिस बेटाजवळ उडी मारून ब्रिटीश सरकारच्या तावडीतून सुटका करून घेण्याचा ऐतिहासिक प्रयत्न केला.
१९५४ - भाक्रा नांगल कालव्याचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याच्या हस्ते उद्घाटन.
१९५८ - बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात 'दो आंखे बारह हाथ' चित्रपटाचा 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' म्हणून सन्मान.
१९९६ - भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष प्रा. यु.आर.राव यांना द्विवार्षिक आंतरराष्ट्रीय 'विक्रम साराभाई पुरस्कार जाहीर'.
२००५ - पंचनाथन मंगेश चंद्रन भारताचा १२ वा ग्रॅंडमास्टर   झाला.