Wednesday, April 27, 2011

१५२१ - माक्टानची लढाई - पृथ्वीप्रदक्षिणा करणारा फर्डिनांड मॅगेलन फिलिपाईन्समध्ये स्थानिक रहिवाश्यांशी लढताना मृत्युमुखी.
१६६७ - अंध व हलाखीत दिवस काढणार्‍या जॉन मिल्टनने आपले महाकाव्य 'पॅरेडाईझ लॉस्ट' १० ब्रिटीश पाउंडला विकले.
१७७३ - भारतातील युद्धांच्या खर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीला वाचवण्यासाठी ब्रिटीश संसदेने 'टी ऍक्ट' करून कंपनीला उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.
१८१० - बीथोव्हेनने आपले प्रसिद्ध पियानो संगीत 'फ्युर एलिझ' रचले.
१८६१ - अब्राहम लिंकनने अमेरिकेत हेबिअस कोर्पसचा मूलभूत हक्क निलंबित केला. यामुळे सरकारला कोणासही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकण्यास मोकळीक मिळाली.
१९०८ - लंडनमध्ये चौथे ऑलिंपिक खेळ सुरू.
१९५० - दक्षिण आफ्रिकेत वंशभेद अधिकृत करणारा कायदा मंजूर झाला.
१९६० - टोगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
१९६१ - सियेरा लिओनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
१९८१ - झेरॉक्स पार्कने 'माउस' वापरण्यास सुरुवात केली.
१९९२ - सर्बिया व मॉन्टेनिग्रोने एकत्र येउन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकची स्थापना केली.
१९९४ - दक्षिण आफ्रिकेत निवडणुका. श्यामवर्णीय व्यक्तिंना मतदान करण्यास प्रथमतः मुभा.
२००५ - एअरबसने आपले ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक दाखवले.

No comments:

Post a Comment