Wednesday, June 15, 2011

१९०७ - ज्येष्ठ समाजवादी नेते, लेखक, विचारवंत नारायण गणेश उर्फ नानासाहेब गोरे यांचा जन्म.
१९३१ - 'संदेश' कार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निधन.
१९३८ - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म.
१९९६ - 'एरियन रॉकेट' फ्रेंच गयाना येथील कोअरु येथून येथून यशस्वीरीत्या अंतराळात झेपावले.
१९९९ - १९५५ मध्ये पोर्तुगीज अमलातून दादरा- नगर-हवेलीची मुक्ती करणाऱ्या आंदोलकांचा 'स्वातंत्र्यसैनिक' म्हणून गौरव.
२००१ - ग्रॅंडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यमचे राष्ट्रीय महिला 'अ' बुद्धिबळ स्पर्धेत विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद.    
 

Tuesday, June 14, 2011

१४ जून

जागतिक रक्तदाता दिन.
१८९६ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 'अनाथ बालिकाश्रम' ही संस्था स्थापन केली.
१९६१ - भौतिकशास्त्रज्ञ सर कार्यमणिक्कम श्रीनिवास कृष्णन (Sir K.S.Krushnan) यांचे निधन.
१९६९ - जर्मनीची टेनिससम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिचा जन्म. 
१९८९ - मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री व संस्कृतपंडित सुहासिनी मुळगावकर यांचे निधन.
१९९५ - कर्नाटकात म्हैसूर येथे आणि पश्चिम बंगालमध्ये खरगपूरजवळ सालबोनी येथे नोटा छापण्याचे दोन छापखाने उभारण्याचा रिझर्व बँकेचा निर्णय.
१९९७ - भारताचा वेगवान गोलंदाज वेकटेश प्रसाद 'सिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू' पुरस्काराचा मानकरी.