Thursday, February 24, 2011

केंद्रीय अबकारी कर दिन.
जागतिक मुद्रण दिन.
१३०४ -  मोरोक्कोचा शोधक इब्न बतुता,याचा जन्म.
१५८२ - पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगरी दिनदर्शिका प्रदर्शित केली.
१६७० - छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म.
१६७४ - नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना मराठी सैन्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर मारले गेले.'वेडात मराठे वीर दौडले सात' ही प्रसिद्ध कविता त्यांच्याच कार्याचे वर्णन  करणारी आहे. 
१७३९ - कर्नालची लढाई - नादीरशहाचा मुघल सैन्यावर विजय.
१९१८ - एस्टोनियाने रशिया पासून स्वातंत्र्य जाहीर केले.
१९२४ - गझलचे बादशहा म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पार्श्वगायक तलत महमूद यांचा जन्म.
१९३८ - दु पॉँतने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरूवात केली.
१९४२ - व्हॉइस ऑफ अमेरिकाचे प्रसारण सुरू.
१९५५ - ऍपल कम्प्युटर्सचा संस्थापक,स्टीव जॉब्स याचा जन्म.
१९८९ - आयातोल्ला खोमेनीने सलमान रश्दींना ठार करण्याबद्दल ३०,००,००० अमेरिकन डॉलरचे बक्षीस जाहीर केले.
२००४ - उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचा व वारंवार बदलला जाणारा केंद्रीय उत्पादनशुल्क कायदा(एक्साईज) ६० वर्षांचा झाला!
२००६ - फिलिपाईन्समध्ये लष्कर उठाव करणार असल्याची कुणकुण लागल्याने राष्ट्राध्यक्ष ग्लोरिया मॅकापगाल-अरोयोने देशात आणिबाणी लागू केली.
२०१० - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या इतिहासात पहिलेवहिले द्विशतक  झळकविण्याचा पराक्रम केला. 
            

Saturday, February 19, 2011

१६३०-छत्रपती शिवाजी महाराज जयंती(तारखेप्रमाणे)
१८६१- रशियामधून 'वेठबिगारी पद्धत' हद्दपार.
१९०६ - माधव सदाशिव गोळवलकर( गोळवलकर गुरुजी) भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक यांचा जन्म.
१९१५- भारतीय स्वातंत्र्यसेनानी, मराठी समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखले,यांचा मृत्यू.

Friday, February 18, 2011

१४८६-'भक्ती'पंथाचे उद्गाते चैतन्य महाप्रभू यांचा बंगालमध्ये जन्म.
१८३६-स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचा जन्म.
१८८३-लंडन येथे कर्झन वायली या ब्रिटीश अधिकाऱ्यावर गोळ्या झाडणारे मदनलाल धिंग्रा यांचा जन्म.
१८९८- जगप्रसिद्ध 'फेरारी' गाडीचा निर्माता एन्झो फेरारी यांचा जन्म.
१९२६-जुन्या जमान्यातील सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री नलिनी जयवंत यांचा जन्म. 
१९३२- जपानच्या साम्राज्याने 'मान्चुकुओ'(मांचुरिया) हे 'रिपब्लिक ऑफ चायना'पासून स्वतंत्र आहे,असे घोषित केले.
१९४६-ब्रिटीशांच्या भारतातील साम्राज्याचा कणा असलेल्या नौदलाने मुंबई येथे ब्रिटीशांविरुद्ध बंड पुकारले. ब्रिटीश सत्तेला अखेरची घरघर.
१९६५- ब्रिटीश वसाहतींतून 'गाम्बिया' स्वतंत्र झाला.
१९७९- दक्षिण अल्जेरियाच्या 'सहारा' वाळवंटात मानवी इतिहासात प्रथमच बर्फवृष्टीची नोंद.
२००७- 'समझौता एक्स्प्रेस' मध्ये पानिपत येथे बॉम्बस्फोट;६८ जण मृत्युमुखी. 

Wednesday, February 9, 2011

 • १८७४ - स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद,यांचा जन्म. 
 • १९०० - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा प्रथम सुरू.
 • १९३३ - साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
 • १९६९ - बोईंग ७४७ विमानाचे सर्वप्रथम उड्डाण.
 •  १९७३ - बिजु पटनायक ओरिसाच्या मुख्यमंत्रीपदी.
 • १९७९ - सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते राजा परांजपे, यांचा मृत्यू.
 • १९८१ - नामवंत कायदेपंडित  न्या.एम.सी.छगला, यांचा मृत्यू.
 • १९८४ - सोवियेत राष्ट्राध्यक्ष युरी आन्द्रोपोव्ह, यांचा मृत्यू.
 • १९८६ - हॅलेचा धूमकेतु सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.
 • १९९६ - ख्यातनाम विचित्रवीणावादक  सी.चिट्टीबाबू चलापल्ली, यांचा मृत्यू.
 • २००० - अभिनेत्री शोभना समर्थ, यांचा मृत्यू.

Tuesday, February 8, 2011

 • बौद्ध धर्मातील महायान पंथीय आजचा दिवस 'निर्वाण दिन' मानतात.
 • १५८७ - स्कॉटलंडची राणी मेरी स्टुअर्ट,हिचा म्रृत्यू.
 • १८२८ - फ्रेंच लेखक जुल्स व्हर्न यांचा जन्म.
 • १९०४ - रशिया आणि जपान यांचे युद्ध सुरु. या युद्धात जपानने बलाढ्य रशियाची दाणादाण उडवली.
 • १९५२- राणी एलिझाबेथ(दुसरी) ही ब्रिटनची सम्राज्ञी म्हणून घोषित.
 • १९५५ - पाकिस्तानच्या-सिंध प्रांताने जहागीरदारी पद्धत बंद केली व १०,००,००० एकर जमीन कुळांमध्ये वाटुन टाकली.
 • १९७१ - नॅस्डॅक शेअरबाजार खुले.
 • १९९४ - अष्टपैलू खेळाडू कपिलदेव निखंज यांनी श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ४३२ वा बळी नोंदवून न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली  यांचा सर्वाधिक बळींचा जागतिक विक्रम मागे टाकला.

Saturday, February 5, 2011 • १९२० - वारकरी संप्रदायाचे कार्य पुढे नेणारे विष्णुबुवा जोग यांचा मृत्यू.
 • १९२२ - रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध.
 • १९५८ - टायबी नावाचा हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
 • १९७६ -  भारतीय चित्रपट अभिनेता. अभिषेक बच्चन,याचा जन्म.
 • १९९६ - मुंबई येथील चौथ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 'सोना माटी' या भारतीय लघुपटाने सुवर्णपदक पटकावले.
 • २००० - रशियाच्या सैन्याने चेच्न्यातील ग्रोझ्नी शहराजवळ ६० नागरिकांना ठार मारले.
 • २००३ - अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
 • २००४ - पुण्याच्या स्वाती घाटेने वूमन ग्रॅंडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला. • Friday, February 4, 2011  • १७८९- जॉर्ज वॉशिंग्टन यांची अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून एकमुखाने निवड.
  • १७९४-फ्रान्समधून गुलामगिरीची प्रथा हद्दपार.
  • १९१७- पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष याह्या खान यांचा जन्म.
  • १९२२-स्वरभास्कर,भारतरत्न कै.पं.भीमसेन जोशी यांचा जन्म.
  • १९४८-ब्रिटीश राष्ट्रकुल वसाहतींतून सिलोन(आताचे श्रीलंका) मुक्त झाले.
  • १९६९- पेलेस्टाइन मुक्ती सेनेची सूत्रे यासर अराफात यांच्या हाती.
  • २००३-'फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाविया'चे 'सर्बिया' आणि 'मोंटेनेग्रो' असे नामांतर.नवीन संविधानाची स्वीकृती.
  • २००४-मार्क झुकेरबर्गने 'फेसबुक'या तुफान लोकप्रिय संकेतस्थळाची निर्मिती केली.

  Thursday, February 3, 2011

  • १४८८ - बार्थोलोम्यु डायसने केप ऑफ गुड होपला वळसा घालून  मॉसेल बे येथे नांगर टाकला. 
  • १६९० - मासेच्युसेट्सने अमेरिकेतील पहिले कागदी चलन वापरायला सुरूवात केली.
  • १८६७ - जपानचा युवराज मात्सुहितोचा सम्राट मैजी या नावाने राज्याभिषेक.
  • १८७० - अमेरिकेच्या संविधानातील १५वा बदल अमलात. मतदानातील वंशभेद संपुष्टात.
  • १९६६ - सोवियेत संघाचे लुना ९ हे मानवविरहीत अंतराळयान चंद्रावर उतरले.
  • १९८४ - स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.