Monday, April 25, 2011

 इटलीचा स्वातंत्र्य दिन-फेस्ता देला लिबरेझियोन.
१६०७ - ८० वर्षांचे युद्ध - नेदरलँड्सने जिब्राल्टरजवळ स्पेनचे आरमार बुडवले.
१७४० - श्रीमंत  थोरले बाजीराव पेशवे यांचा मृत्यू.
१७९२ - क्लॉड जोसेफ रूगे दि लिलने फ्रेंच राष्ट्रगीत 'ला मार्सेल'ची रचना केली.
१८४६ - मेक्सिको व टेक्सासच्या प्रजासत्ताक मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी सुरू.
१८५९ - सुएझ कालव्याची पायाभरणी.
१८७४ - रेडियोचा शोध लावणारे शास्त्रज्ञ मार्कोनी यांचा जन्म.
१९२६ -  इराणमध्ये रझा शाह पहलवी सत्तेवर.
१९५४ - जगातल्या सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पाय ठेवणारी पहिली भारतीय महिला बचेंद्री पाल हिचा जन्म.
१९७४ - पोर्तुगालमध्ये जनतेचा उठाव. लोकशाही पुन्हा अमलात.
१९८३ - अंतराळयान 'पायोनियर १०' सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.
२००० - वादग्रस्त अलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत(सध्या ५०९ मीटर)वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला परवानगी दिली.

2 comments:

 1. अगं राऊंची म्हणजे थोरल्या बाजीरावांची पुण्यतीथी २८ एप्रिल रोजी आहे. नासिरजंगला यथेच्छ बडवल्यावर त्यांना जो प्रदेश मिळाला त्याची व्यवस्था लावण्यासाठी ते मध्यप्रदेशातल्या खरगोण जिल्ह्यातील रावेरखेडि या गावी गेले होते. इथे मराठ्यांचा "चुंगीनाका" म्हणजे नर्मदेवरचे कर गोळा करण्याचे मोठे ठिकाण होते. या ठिकाणी त्यांना एप्रिलच्या उष्णतेमुळे विषमज्वर झाला. हिंदित याला "लू" लगना म्हणतात. त्यात त्यांचे देहावसन झाले दिवस होता २८ एप्रिल १७४०(वैशाख शुध्द शके १६६२). आजही त्यांची समाधी सुस्थितीत तिथे आहे.प्रत्येक मराठी माणसाने "रायगड" इतक्याच भक्तीभावाने तिथेही जाऊन डोकं टेकवावं इतकिच अपेक्षा. :-)

  अधिक माहीतीसाठी -
  http://sahajsuchalamhanun.blogspot.com/2010/12/blog-post.html

  आणि

  http://sahajsuchalamhanun.blogspot.com/2007/11/blog-post_05.html (यातला बाजीरावांचा भाग वाच)

  ReplyDelete