Thursday, March 17, 2011

१८६१ - 'इटलीच्या साम्राज्या'ची(१८६१-१९४६) घोषणा.
१९०९ - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्यापंडित डॉ.रा.ना.दांडेकर यांचा जन्म. 
१९२० - बांगलादेशचे संस्थापक नेते, 'वंगबंधू' शेख मुजीबुर रेहमान यांचा जन्म.
१९४८ - बेनेलक्स,फ्रान्स आणि ब्रिटन यांमध्ये 'ब्रुसेल्स'चा तह. शीतयुद्धामध्ये अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन(नाटो) ची ही पहिली पायरी होती.
१९४२ - अमानुष  हॉलोकॉस्टची सुरुवात- 'लव्हीव घेटो'मधील ज्यूंना सध्याच्या पूर्व पोलंड मधील 'बेल्झेक गॅस चेंबर' मध्ये ठार करण्यात आले.
१९६२ - भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला हिचा जन्म.
१९६९ - गोल्डा मायर इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
२००४ - पाकिस्तानच्या किरण बलोच हिने महिला क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला.
२००६ - 'नोबेल'विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ.अमर्त्य सेन यांना आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रासाठी नेमलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक व सामाजिक आयोगाने(युनिस्कॅप) जीवनगौरव पुरस्कार देण्याचे जाहीर. 'युनिस्कॅप' च्या वतीने देण्यात येणारा हा पहिलाच जीवनगौरव पुरस्कार आहे.

No comments:

Post a Comment