Monday, March 21, 2011

पृथ्वी दिन
मानवी हक्क दिन-दक्षिण आफ्रिका.
वंशभेद निर्मूलन दिन-संयुक्त राष्ट्रे.
१३४९ - एरफुर्ट, जर्मनी येथे दंगलीत ३,००० ज्यूंची कत्तल.
१४९२ - अलोंझो पेट्रो हा खलाशी कोलंबससोबत सागरसफरीला निघाला.
१६१० - राजा जेम्स प्रथम याचे इंग्लंडच्या लोकसभेला उद्देशून भाषण.
१७९० - थॉमस जेफरसन यांनी राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याकडे न्युयॉर्क येथे राज्याचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
१८०४ - नेपोलियनचा फ्रेंच नागरी कायदा स्वीकृत.
१८४४ - बहाई सनाची सुरुवात.
१८५९ - एडिनबर्ग येथे स्कॉटिश नॅशनल गॅलरीची स्थापना.
१८५९ - झूऑलॉजिकल सोसायटी ऑफ फिलाडेल्फिया ह्या अमेरिकेतील पहिल्या प्राणिशास्त्रीय संघटनेची स्थापना.
१८६८ - सोरोसिस या अमेरिकेतील पहिल्या व्यावसायिक महिला क्लबची न्यूयॉर्क येथे स्थापना.
१८७१ - बिस्मार्क जर्मनीच्या चान्सेलरपदी.
१९१६  - ज्येष्ठ  भारतीय सनईवादक,'भारतरत्न' बिस्मिल्ला खाँ यांचा जन्म.
१९३५ - पर्शियाचे इराण हे अधिकृतरीत्या नामकरण.
१९७१ - क्रिकेट खेळात जॉर्जटाऊन येथे भारताच्या सुनील गावस्करचे त्याच्या विक्रमी ३४ कसोटी शतकांपैकी पहिलेवहिले शतक, ११६ धावा.
१९७५ - ३००० वर्षांनंतर इथियोपियातील राजेशाही समाप्त.
१९७९ - इजिप्शियन संसदेची इस्रायेलशी शांतता करार करण्यास अविरोध मान्यता.
१९८० - अमेरिकेने सोवियेत संघाच्या मॉस्को शहरात होऊ घातलेल्या बाविसाव्या ऑलिंपिक खेळांवर बहिष्कार टाकला.
१९९० - नामिबिया दक्षिण आफ्रिकेपासून स्वतंत्र झाले; सॅम नुजाना राष्ट्राध्यक्ष.

No comments:

Post a Comment