Wednesday, March 16, 2011


११९० - ख्रिश्चनधर्मीयांनी इंग्लंडच्या यॉर्क शहरात ज्यू व्यक्तींचे सक्तीने धर्मांतर सुरू केले. धर्मांतर न करून घेणार्‍यांना मृत्यूदंड दिला गेला. अनेक ज्यूंनी ख्रिश्चन होण्यापेक्षा आत्महत्त्या करणे पसंत केले.
१५२१ - फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोचला.
१७८९ - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ,जॉर्ज सायमन ओह्म याचा जन्म.
१८७७ - इराणचा शाह,रझा शाह पेहलवी याचा जन्म.
१९२६ - रॉबर्ट गॉडार्डने पहिले द्रव-इंधनचालित रॉकेट प्रक्षेपित केले.
१९३९  -  इराणचा शहा मोहम्मद रझा शाह पेहलवी
याचा इजिप्तची राजकन्या फौझिया हिच्याशी निकाह.
१९४५ - ज्येष्ठ क्रांतिकारक,गणेश दामोदर उर्फ बाबाराव सावरकर यांचे निधन.स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते ज्येष्ठ बंधू होते. 
१९६३ - बाली बेटावरील माउंट अगुंग या ज्वालामुखीचा उद्रेक. ११,००० ठार.
१९८८ - इराकने हलाब्जा या कुर्दिस्तानमधील शहरावर विषारी वायुने हल्ला केला. हजारो मृत्युमुखी.
१९९५ - अमेरिकेच्या मिसिसिपी राज्याने अधिकृत रीत्या गुलामगिरीची प्रथा बेकायदा ठरवली.
१९९८ - दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ज्यूंचे शिरकाण सुरू असताना त्याविरुद्ध आवाज न उठवल्याबद्दल पोप जॉन पॉल दुसर्‍याने ख्रिश्चन धर्मीयांच्या वतीने जाहीर माफी मागितली.
२००७ - २००७च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने नेदरलँड्सच्या डान व्हान बुंगेच्या एका षटकात ६ षटकार मारले. हा विश्वचषक तसेच एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील उच्चांक आहे.

1 comment:

  1. १६मार्च१९८८ साठी केलेली नोंद खरी आहे वा नाही य़ाची शहानिशा करणे अत्यावश्यक आहे.

    ReplyDelete