Monday, March 14, 2011

१८८३ -  समाजवादी विचारवंत व लेखक कार्ल मार्क्स,याचा मृत्यू.जागतिक राजकारणाला त्याच्या तत्त्वांमुळे एक वेगळा आयाम आणि कलाटणी प्राप्त झाली.
१८७९ - 'सापेक्षता सिद्धांता'चा जनक,जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांचा जर्मनीतील उल्म (रुटेनबर्ग) येथे जन्म.  
१८८९ - फर्डिनांड फोन झेपेलिनने 'बलून'चे पेटंट घेतले.
१९०० - 'गोल्ड स्टँडर्ड ऍक्ट' मंजूर झाल्यावर अमेरिकेचे चलन,अमेरिकन डॉलरची किंमत सोन्याशी निगडीत झाली.
१९३१ - पहिला भारतीय बोलपट 'आलम आरा' मुंबईमध्ये प्रदर्शित.
१९७८ - ऑपरेशन लिटानी - इस्रायेलच्या सैन्याने लेबेनॉनचा दक्षिण भाग बळकावला.
१९९४ - 'लिनक्स'ची १.० आवृत्ती प्रकाशित.
१९९८ - इराणमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप.
२०१० - 'देणाऱ्याने देत जावे' असे म्हणत रसिकांना भरभरून काव्यानंद देणारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांचे निधन.

No comments:

Post a Comment