Friday, March 11, 2011

१६६५ - न्यूयॉर्कमध्ये प्रोटेस्टंट पंथीयांना धार्मिक अधिकार बहाल.
१७०२ - इंग्लंड मधील पहिले वृत्तपत्र 'डेली कौरंट' प्रथमच प्रकाशित झाले.
१७८४ - 'मेंगलोरच्या तहा'ने दुसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धाची सांगता.  
१८८६ - आनंदीबाई जोशी यांना अमेरिकेतील फिलाडेल्फिया विद्यापीठाची एम.डी.ही पदवी मिळाली.डॉक्टर होणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला.
१९१५ - भारताचे अव्वल दर्जाचे दमदार फलंदाज विजय हजारे यांचा जन्म.महाराष्ट्र,मध्य भारत,बडोद्यासाठी खेळलेल्या हजारे यांना भारतातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानले जाते.
१९५५ - अनेक गंभीर रोगांवर इलाज ठरलेल्या 'पेनिसिलीन' या क्रांतिकारक औषधाचा शोध लावणारे ब्रिटीश सूक्ष्मजंतू शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे निधन.
१९८२ - मिखाईल गोर्बाचेव्ह सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष झाले.
१९९२  - नौदलाचा सर्वात मोठा व अत्याधुनिक बहुपयोगी 'राजली' हा हवाईतळ राष्ट्राला अर्पण करून कार्यान्वित करण्यात आला.नौदलाचा हा चौथा हवाईतळ असून तो मद्रास येथून ८० किमी.वर आहे.
१९९९ - 'नॅस्डॅक' मध्ये नोंदणी होणारी 'इन्फोसिस'ही पहिली भारतीय कंपनी ठरली.
२००१ - कसोटी क्रिकेटमध्ये पहिली हॅटट्रिक करणारा भारतीय गोलंदाज बनण्याचा बहुमान हरभजन सिंगने मिळवला.

No comments:

Post a Comment