Thursday, February 24, 2011

केंद्रीय अबकारी कर दिन.
जागतिक मुद्रण दिन.
१३०४ -  मोरोक्कोचा शोधक इब्न बतुता,याचा जन्म.
१५८२ - पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगरी दिनदर्शिका प्रदर्शित केली.
१६७० - छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म.
१६७४ - नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना मराठी सैन्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर मारले गेले.'वेडात मराठे वीर दौडले सात' ही प्रसिद्ध कविता त्यांच्याच कार्याचे वर्णन  करणारी आहे. 
१७३९ - कर्नालची लढाई - नादीरशहाचा मुघल सैन्यावर विजय.
१९१८ - एस्टोनियाने रशिया पासून स्वातंत्र्य जाहीर केले.
१९२४ - गझलचे बादशहा म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पार्श्वगायक तलत महमूद यांचा जन्म.
१९३८ - दु पॉँतने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरूवात केली.
१९४२ - व्हॉइस ऑफ अमेरिकाचे प्रसारण सुरू.
१९५५ - ऍपल कम्प्युटर्सचा संस्थापक,स्टीव जॉब्स याचा जन्म.
१९८९ - आयातोल्ला खोमेनीने सलमान रश्दींना ठार करण्याबद्दल ३०,००,००० अमेरिकन डॉलरचे बक्षीस जाहीर केले.
२००४ - उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचा व वारंवार बदलला जाणारा केंद्रीय उत्पादनशुल्क कायदा(एक्साईज) ६० वर्षांचा झाला!
२००६ - फिलिपाईन्समध्ये लष्कर उठाव करणार असल्याची कुणकुण लागल्याने राष्ट्राध्यक्ष ग्लोरिया मॅकापगाल-अरोयोने देशात आणिबाणी लागू केली.
२०१० - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या इतिहासात पहिलेवहिले द्विशतक  झळकविण्याचा पराक्रम केला. 
            

1 comment:

  1. OMG? how can i forget????? today is a first B'day of Double Century in ODI By the "Emperor"?? :-D :-p :-D ....... & if ..... WI wins against SA today, then please note down ... 24 feb is unlucky day for SA :-D :-D

    ReplyDelete