Friday, February 18, 2011

१४८६-'भक्ती'पंथाचे उद्गाते चैतन्य महाप्रभू यांचा बंगालमध्ये जन्म.
१८३६-स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचा जन्म.
१८८३-लंडन येथे कर्झन वायली या ब्रिटीश अधिकाऱ्यावर गोळ्या झाडणारे मदनलाल धिंग्रा यांचा जन्म.
१८९८- जगप्रसिद्ध 'फेरारी' गाडीचा निर्माता एन्झो फेरारी यांचा जन्म.
१९२६-जुन्या जमान्यातील सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री नलिनी जयवंत यांचा जन्म. 
१९३२- जपानच्या साम्राज्याने 'मान्चुकुओ'(मांचुरिया) हे 'रिपब्लिक ऑफ चायना'पासून स्वतंत्र आहे,असे घोषित केले.
१९४६-ब्रिटीशांच्या भारतातील साम्राज्याचा कणा असलेल्या नौदलाने मुंबई येथे ब्रिटीशांविरुद्ध बंड पुकारले. ब्रिटीश सत्तेला अखेरची घरघर.
१९६५- ब्रिटीश वसाहतींतून 'गाम्बिया' स्वतंत्र झाला.
१९७९- दक्षिण अल्जेरियाच्या 'सहारा' वाळवंटात मानवी इतिहासात प्रथमच बर्फवृष्टीची नोंद.
२००७- 'समझौता एक्स्प्रेस' मध्ये पानिपत येथे बॉम्बस्फोट;६८ जण मृत्युमुखी. 

1 comment:

  1. "तलवार" या बोटिवरच्या काही भारतीय नौसैनिकांनी हा ऊठाव केला होता.

    ReplyDelete