Monday, January 24, 2011


 • राष्ट्रीय बालिका दिवस.
 • १९०८ -रॉबर्ट बाडेन-पॉवेलने बॉय स्काउट्स सुरू केले.
 • १९२४ -सेंट पीटर्सबर्गचे नाव बदलून लेनिनग्राड करण्यात आले.
 • १९३६ -आल्बेर सराउ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
 • १९४३ -दुसरे महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट व इंग्लिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी कॅसा ब्लांका येथील परिषद आटोपली.
 • १९४५ -दुसरे महायुद्ध - रशियन सैन्याने ऑश्विझ कॉन्सेन्ट्रेशन कॅम्प मुक्त केला.
 • १९६६ -एर इंडियाचे बोईंग ७०७ जातीचे विमान युरोपमधील मोंट ब्लांक या सर्वोच्च शिखरावर कोसळले. ११७ ठार. मृतांत ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ होमी भाभा.
 • १९७२ -गुआममध्ये इ.स. १९४४पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. याकोइला दुसरे महायुद्ध संपलेले माहिती नव्हते.
 • १९८६ - अंतराळयान व्होयेजर २ युरेनसपासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले.
 • १९८७ - लेबेनॉनमध्ये अतिरेक्यांनी अलान स्टीन, जेसी टर्नर, रॉबर्ट पॉलहिल व मिथिलेश्वर सिंग यांचे अपहरण केले.
 • २०११ - ज्येष्ठ हिंदुस्तानी शास्त्रीय गायक  भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे निधन.

[संपादन]

No comments:

Post a Comment