१८८१ - तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष व समाजसुधारक मुस्तफा कमाल अतातुर्क(कमाल पाशा) यांचा जन्म.
१९१८ - रशियाने आपली राजधानी सेंट पीटर्सबर्गहून मॉस्कोला हलवली.
१९२८ - कॅलिफोर्नियातील सेंट फ्रांसिस धरण फुटून आलेल्या पुरात ४०० मृत्युमुखी.
१९३० - ब्रिटीश सरकारने भारतात तयार केलेल्या मीठावर लादलेल्या कराविरुद्ध महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरू केली.
१९३८ - जर्मनीचे सैन्य ऑस्ट्रियात घुसले.
१९४० - फिनलंडने सोवियेत संघाशी तह करून फिनिश कारेलिया देउन टाकले व आपले सैन्य व जनता तेथून हलवली.
१९६० - दक्षिण कोरियाच्या पुसान शहरातील रसायन कारखान्याला आग. ६८ ठार.
१९६७ - सुहार्तो इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१९६८ - मॉरिशसला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
१९९२ - मॉरिशस प्रजासत्ताक राष्ट्र झाले.
१९९३ - मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी.
१९९९ - चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड युरोपीय संघात दाखल.
२००६ - क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने केलेल्या ४३४ धावांना दक्षिण आफ्रिकेचे ९ बाद ४३८ असे उच्चांकी प्रत्युत्तर.
