४२१ - असे मानले जाते की,इटलीमधील 'व्हेनिस' या शहराची आजच्या दिवशी दुपारी ठीक १२ वाजता निर्मिती झाली.
१६५५ -ख्रिस्टीयन ह्युजीन्स याने शनीचा सर्व मोठा चंद्र 'टायटन' प्रथम शोधला.
१८२१ - 'ऑटोमन साम्राज्याविरोधात 'ग्रीस'चा उठाव.'ग्रीकांच्या स्वातंत्र्ययुद्धा'ची सुरुवात.
१९१४ - 'बेलारूस'चा स्वातंत्र्यदिन. ' बेलारुशियन पीपल्स रिपब्लिक'ची स्थापना.
१९१८ - जागतिक हरितक्रांतीचे प्रणेते,नामवंत शेतीशास्त्रज्ञ डॉ. नॉर्मन बोरलॉग
यांचा जन्म.
१९१८ - जागतिक हरितक्रांतीचे प्रणेते,नामवंत शेतीशास्त्रज्ञ डॉ. नॉर्मन बोरलॉग
यांचा जन्म.
१९३२ - सुप्रसिद्ध साहित्यिक व.पु.काळे यांचा जन्म.
१९५७ - पश्चिम जर्मनी,फ्रान्स,इटली,बेल्जीअम,नेदरलॅण्डस् व लक्झेम्बर्ग या देशांनी एकत्र येऊन 'युरोपियन आर्थिक महासंघ'(The European Economic Community) स्थापन केला.
१९७१ - बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध- पूर्व पाकिस्तानमधल्या नागरिकांविरुद्ध पाकिस्तानी लष्कराने 'ऑपरेशन सर्चलाईट' ची सुरुवात केली.
१९९७ - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने भारताच्या वासुदेवन भास्करन यांना 'मास्टर्स प्रशस्तीपत्रक' देऊन गौरविले. हॉकी मार्गदर्शकांना देण्यात येणारा हा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
