Thursday, September 8, 2011

१९०० - अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन शहरावर आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.
१९१४ - पहिले महायुद्ध-लढाई चालू असताना हुकुमाविरुद्ध रणांगणावरुन पळून गेलेल्या थॉमस हायगेटला युनायटेड किंग्डमने मृत्युदंड दिला.
१९२६ - जर्मनीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश देण्यात आला.
१९३३ - चिरतरुण भारतीय पार्श्वगायिका आशा भोसले, यांचा जन्म.
१९४४ - दुसरे महायुद्ध-लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला.
१९४५ - शीतयुद्ध-अमेरिकेचे सैनिक दक्षिण कोरियात दाखल.
१९६२ - अल्जीरीयाने नवीन संविधान अंगिकारले.
१९६६ - 'स्टार ट्रेक' मालिकेच्या पहिल्या भागाचे प्रसारण.
१९७४ - वॉटरगेट प्रकरण - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेरी फोर्ड यांनी रिचर्ड निक्सनला त्याने केलेल्या गुन्ह्यांची माफी दिली.
१९९१ - मॅसिडोनियाला स्वातंत्र्य.

Wednesday, September 7, 2011

११९१ - तिसरी क्रुसेड - इंग्लंडचा राजा रिचर्ड पहिल्याने सलाद्दिनला हरवले.
१५५२ - शिखांचे दुसरे गुरु अंगद देव यांचा मृत्यू.
१९४० - दुसरे महायुद्ध-ब्लिट्झ - जर्मनीने लंडनवर बॉम्बफेक सुरू केली. यानंतर ५६ अजून रात्री सतत बॉम्बवर्षा होत राहिली.
१९४३ - दुसरे महायुद्ध - जर्मनीची पूर्व आघाडीवरुन पीछेहाट सुरू झाली.
१९५३ - निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या सर्वेसर्वापदी.
१९४५ - दुसरे महायुद्ध - जपानच्या सैन्याने ने वेक द्वीपावर आत्मसमर्पण केले.
१९९८ - लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली.
१९९९ - अथेन्समध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ५.९ तीव्रतेचा भूकंप. १४३ ठार, ५०० जखमी.
२००५ - इजिप्तमध्ये पहिल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.

Tuesday, July 19, 2011


१९३८ - खगोलशास्त्रज्ञ व खगोलभौतिकी क्षेत्रांतील शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म.
१९९३ - ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्याच्या कार्याबद्दल डॉ. बानू कोयाजी यांना 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार' जाहीर.
२००५ - देशातील दूरसंचार क्रांतीचे शिल्पकार सॅम पित्रोडा यांना 'लोकमान्य टिळक पुरस्कार' जाहीर.
२०१० - 'ब्लॅक बॉक्स'  चे जनक, संशोधक डॉ. डेव्हिड वॉरेन यांचे निधन.

Wednesday, July 13, 2011

१६६० - आदिलशाही  फौजा घोडखिंडीत रोखून धरून बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राणार्पण केले.
१७६२ - इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ जेम्स ब्रॅडली यांचे निधन.
१८९६ - बेन्झीन रेणूच्या संरचनेचा जनक, जर्मनीचे प्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञ फेड्रिक केकुल यांचे निधन.
१९२४ - अर्थशास्त्रज्ञ आल्फ्रेड मार्शल यांचे निधन.
१९६९ - महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद यांचे निधन.
२००४ - ऑस्ट्रेलियाचा अव्वल लेगस्पिनर शेन वॉर्नने मुथय्या मुरलीधरनच्या ५२७ बळींच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी केली.  

Friday, July 8, 2011

१९१० - स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्सेलिस बेटाजवळ उडी मारून ब्रिटीश सरकारच्या तावडीतून सुटका करून घेण्याचा ऐतिहासिक प्रयत्न केला.
१९५४ - भाक्रा नांगल कालव्याचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याच्या हस्ते उद्घाटन.
१९५८ - बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात 'दो आंखे बारह हाथ' चित्रपटाचा 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' म्हणून सन्मान.
१९९६ - भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष प्रा. यु.आर.राव यांना द्विवार्षिक आंतरराष्ट्रीय 'विक्रम साराभाई पुरस्कार जाहीर'.
२००५ - पंचनाथन मंगेश चंद्रन भारताचा १२ वा ग्रॅंडमास्टर   झाला.  

Wednesday, June 15, 2011

१९०७ - ज्येष्ठ समाजवादी नेते, लेखक, विचारवंत नारायण गणेश उर्फ नानासाहेब गोरे यांचा जन्म.
१९३१ - 'संदेश' कार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निधन.
१९३८ - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म.
१९९६ - 'एरियन रॉकेट' फ्रेंच गयाना येथील कोअरु येथून येथून यशस्वीरीत्या अंतराळात झेपावले.
१९९९ - १९५५ मध्ये पोर्तुगीज अमलातून दादरा- नगर-हवेलीची मुक्ती करणाऱ्या आंदोलकांचा 'स्वातंत्र्यसैनिक' म्हणून गौरव.
२००१ - ग्रॅंडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यमचे राष्ट्रीय महिला 'अ' बुद्धिबळ स्पर्धेत विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद.    
 

Tuesday, June 14, 2011

१४ जून

जागतिक रक्तदाता दिन.
१८९६ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 'अनाथ बालिकाश्रम' ही संस्था स्थापन केली.
१९६१ - भौतिकशास्त्रज्ञ सर कार्यमणिक्कम श्रीनिवास कृष्णन (Sir K.S.Krushnan) यांचे निधन.
१९६९ - जर्मनीची टेनिससम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिचा जन्म. 
१९८९ - मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री व संस्कृतपंडित सुहासिनी मुळगावकर यांचे निधन.
१९९५ - कर्नाटकात म्हैसूर येथे आणि पश्चिम बंगालमध्ये खरगपूरजवळ सालबोनी येथे नोटा छापण्याचे दोन छापखाने उभारण्याचा रिझर्व बँकेचा निर्णय.
१९९७ - भारताचा वेगवान गोलंदाज वेकटेश प्रसाद 'सिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू' पुरस्काराचा मानकरी.