Tuesday, March 29, 2011

बोगांडा दिन - मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक.
युवा दिन - तैवान.
१७९२ - स्वीडनचा राजा गुस्ताव तिसर्‍याचा मृत्यू. गुस्ताव चौथा एडोल्फ राजेपदी.
१८०९ - स्वीडनमध्ये राजा गुस्ताव चौथ्या एडोल्फविरुद्ध उठाव. स्वीडनचा भाग असलेल्या फिनलंडने रशियाशी संधान बांधले.
१८४७ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - जनरल विनफील्ड स्कॉटच्या नेतृत्त्वाखाली अमेरिकेच्या सैन्याने व्हेराक्रुझ शहर जिंकले.
१८४९ - ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने पंजाब खालसा केले.
१८५७ - मंगल पांडे या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकार्‍यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो.
१८८२ - नाइट्स ऑफ कोलंबस या संस्थेची स्थापना.
१९२९ - सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता उत्पल दत्त यांचा जन्म. (मृत्यु:१९९३)
१९३६ - जर्मनीत एडॉल्फ हिटलरने जनतेकडे र्‍हाइनलँड बळकावण्यासाठी कौल मागितला. याला ९९.५% मतदारांनी उजवा कौल दिला.
१९६२ - भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलिन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे अनावरण झाले.
१९७१ - व्हिएतनाम युद्ध-माय लाईची कत्तल - निरपराध व निःशस्त्र नागरिकांची हत्या करणार्‍या अमेरिकन सैनिक लेफ्टनंट विल्यम कॅलीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
१९७३ - व्हिएतनाम युद्ध - शेवटच्या अमेरिकन सैनिकांनी दक्षिण व्हिएतनाममधून माघार घेतली.
१९८२ - एन.टी. रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली.
२००३ - बल्गेरिया, एस्टोनिया, लाटव्हिया, लिथुएनिया, रोमेनिया, स्लोव्हाकिया व स्लोव्हेनियाला 'नाटो'चे सभासदत्त्व.

Monday, March 28, 2011

८४५ - व्हायकिंग सरदार राग्नार लोडब्रोकने पॅरिस शहर लुटले.
१७७६ - हुआन बॉतिस्ता दि आन्झाने सान फ्रांसिस्कोचा किल्ला बांधायला सुरुवात केली.
१८५४ - क्रिमियन युद्ध - फ्रांसने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१८६८ - रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की याचा जन्म.
१९३० - तुर्कस्तानमधील कॉँस्टेन्टिनोपल व अंगोरा शहरांनी आपली नावे बदलून अनुक्रमे इस्तंबूल व अंकारा अशी ठेवली.
१९६९ - अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवर, यांचा मृत्यू.
१९७९ - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील थ्री माइल आयलंड अणुशक्ती केंद्रातील शीतक बंद पडला व त्यामुळे किरणोत्सर्गी पाणी वाफरुपे हवेतून पसरले.
१९७९ - युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान जेम्स कॅलाहान विरुद्ध अविश्वासाचा ठराव एका मताने मान्य झाल्यावर सरकार कोसळले व संसद विसर्जित केली गेली.
१९९२ - भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे. आर. डी. टाटा यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
१९९७ -  सामाजिक कार्यकर्ता, भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या श्रीमती पुपुल जयकर,यांचा मृत्यू.
१९९८ - सी-डॅक ने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.
२००५ - सुमात्रा बेटावर रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.७ तीव्रतेचा भूकंप.
२००८ - भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३०९ धावांची नाबाद खेळी केली व सर डॉन ब्रॅडमन व ब्रायन लारानंतर दोन त्रिशतके फटकावणारा तिसरा फलंदाज झाला. चार वर्षांपूर्वी मार्च २९ला सेहवागने पाकिस्तानविरुद्ध त्रिशतकी खेळी केली होती.

Friday, March 25, 2011

 ४२१   - असे मानले जाते की,इटलीमधील 'व्हेनिस' या शहराची आजच्या दिवशी दुपारी ठीक १२ वाजता निर्मिती झाली.
१६५५ -ख्रिस्टीयन ह्युजीन्स याने शनीचा सर्व मोठा चंद्र 'टायटन' प्रथम शोधला.
१८२१ - 'ऑटोमन साम्राज्याविरोधात 'ग्रीस'चा उठाव.'ग्रीकांच्या स्वातंत्र्ययुद्धा'ची सुरुवात.
१९१४ - 'बेलारूस'चा स्वातंत्र्यदिन. ' बेलारुशियन पीपल्स रिपब्लिक'ची स्थापना.
१९१८ - जागतिक हरितक्रांतीचे प्रणेते,नामवंत शेतीशास्त्रज्ञ डॉ. नॉर्मन बोरलॉग 
यांचा जन्म.
१९३२ - सुप्रसिद्ध साहित्यिक व.पु.काळे यांचा जन्म.
१९५७ - पश्चिम जर्मनी,फ्रान्स,इटली,बेल्जीअम,नेदरलॅण्डस् व लक्झेम्बर्ग या देशांनी एकत्र येऊन 'युरोपियन आर्थिक महासंघ'(The European Economic Community) स्थापन केला.
१९७१ - बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध- पूर्व पाकिस्तानमधल्या नागरिकांविरुद्ध पाकिस्तानी लष्कराने 'ऑपरेशन सर्चलाईट' ची सुरुवात केली.
१९९७ - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने भारताच्या वासुदेवन भास्करन यांना 'मास्टर्स प्रशस्तीपत्रक' देऊन गौरविले. हॉकी मार्गदर्शकांना देण्यात येणारा हा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
    

Thursday, March 24, 2011

८०९ - बगदादचा खलिफा हरून-अल- रशीद याचा मृत्यू.
१८३७ - कॅनडाने आफ्रिकन कॅनडियन  नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला.
१८५५ - आग्रा आणि कलकत्तादरम्यान तारसेवा सुरु झाली. 
१८९६ - ए.ए.पोपोव्ह याने इतिहासातील पहिला रेडियो ट्रान्समिशन सिग्नल पाठवला.
१९०५ - फ्रेंच लेखक ज्युल्स व्हर्न याचा मृत्यू.
१९२३ - 'ग्रीस' देश 'रिपब्लिक' बनला.
१९९७ - कागद कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यातून 'लिग्निन' हा पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेला घटक दूर करण्याचे तंत्र शोधण्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) संशोधकांना यश आले.
१९९८ - खर्च आणि उत्पन्नाच्या बाबतीत नवे उच्चांक स्थापित करणाऱ्या 'टायटॅनिक' या चित्रपटाने अकरा ऑस्कर पारितोषिके मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला.
१९९९ - कोसोव्हो युद्ध-'नाटो' सैन्याने युगोस्लावियावर बॉम्बफेक केली. कोणत्याही स्वतंत्र राष्ट्रावर 'नाटो' ने हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ होती.
२००८ - पहिल्या जाहीर निवडणुका घेऊन 'भूतान' हे अधिकृत लोकशाही राष्ट्र बनले.

Monday, March 21, 2011

पृथ्वी दिन
मानवी हक्क दिन-दक्षिण आफ्रिका.
वंशभेद निर्मूलन दिन-संयुक्त राष्ट्रे.
१३४९ - एरफुर्ट, जर्मनी येथे दंगलीत ३,००० ज्यूंची कत्तल.
१४९२ - अलोंझो पेट्रो हा खलाशी कोलंबससोबत सागरसफरीला निघाला.
१६१० - राजा जेम्स प्रथम याचे इंग्लंडच्या लोकसभेला उद्देशून भाषण.
१७९० - थॉमस जेफरसन यांनी राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याकडे न्युयॉर्क येथे राज्याचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
१८०४ - नेपोलियनचा फ्रेंच नागरी कायदा स्वीकृत.
१८४४ - बहाई सनाची सुरुवात.
१८५९ - एडिनबर्ग येथे स्कॉटिश नॅशनल गॅलरीची स्थापना.
१८५९ - झूऑलॉजिकल सोसायटी ऑफ फिलाडेल्फिया ह्या अमेरिकेतील पहिल्या प्राणिशास्त्रीय संघटनेची स्थापना.
१८६८ - सोरोसिस या अमेरिकेतील पहिल्या व्यावसायिक महिला क्लबची न्यूयॉर्क येथे स्थापना.
१८७१ - बिस्मार्क जर्मनीच्या चान्सेलरपदी.
१९१६  - ज्येष्ठ  भारतीय सनईवादक,'भारतरत्न' बिस्मिल्ला खाँ यांचा जन्म.
१९३५ - पर्शियाचे इराण हे अधिकृतरीत्या नामकरण.
१९७१ - क्रिकेट खेळात जॉर्जटाऊन येथे भारताच्या सुनील गावस्करचे त्याच्या विक्रमी ३४ कसोटी शतकांपैकी पहिलेवहिले शतक, ११६ धावा.
१९७५ - ३००० वर्षांनंतर इथियोपियातील राजेशाही समाप्त.
१९७९ - इजिप्शियन संसदेची इस्रायेलशी शांतता करार करण्यास अविरोध मान्यता.
१९८० - अमेरिकेने सोवियेत संघाच्या मॉस्को शहरात होऊ घातलेल्या बाविसाव्या ऑलिंपिक खेळांवर बहिष्कार टाकला.
१९९० - नामिबिया दक्षिण आफ्रिकेपासून स्वतंत्र झाले; सॅम नुजाना राष्ट्राध्यक्ष.

कानगोष्टी: माझा इंटरव्ह्यू..!!!

कानगोष्टी: माझा इंटरव्ह्यू..!!!: "आपलं कोणी कौतुक करतंय,प्रेमाने पाठ थोपटतंय ही इतकी सुंदर भावना आहे..प्रचंड उर्जा देणारी..नवीन अधिक चांगलं काम करण्यासाठी उर्मी देणारी...'मरा..."

Thursday, March 17, 2011

१८६१ - 'इटलीच्या साम्राज्या'ची(१८६१-१९४६) घोषणा.
१९०९ - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्राच्यविद्यापंडित डॉ.रा.ना.दांडेकर यांचा जन्म. 
१९२० - बांगलादेशचे संस्थापक नेते, 'वंगबंधू' शेख मुजीबुर रेहमान यांचा जन्म.
१९४८ - बेनेलक्स,फ्रान्स आणि ब्रिटन यांमध्ये 'ब्रुसेल्स'चा तह. शीतयुद्धामध्ये अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन(नाटो) ची ही पहिली पायरी होती.
१९४२ - अमानुष  हॉलोकॉस्टची सुरुवात- 'लव्हीव घेटो'मधील ज्यूंना सध्याच्या पूर्व पोलंड मधील 'बेल्झेक गॅस चेंबर' मध्ये ठार करण्यात आले.
१९६२ - भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला हिचा जन्म.
१९६९ - गोल्डा मायर इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
२००४ - पाकिस्तानच्या किरण बलोच हिने महिला क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला.
२००६ - 'नोबेल'विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ.अमर्त्य सेन यांना आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रासाठी नेमलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक व सामाजिक आयोगाने(युनिस्कॅप) जीवनगौरव पुरस्कार देण्याचे जाहीर. 'युनिस्कॅप' च्या वतीने देण्यात येणारा हा पहिलाच जीवनगौरव पुरस्कार आहे.

Wednesday, March 16, 2011


११९० - ख्रिश्चनधर्मीयांनी इंग्लंडच्या यॉर्क शहरात ज्यू व्यक्तींचे सक्तीने धर्मांतर सुरू केले. धर्मांतर न करून घेणार्‍यांना मृत्यूदंड दिला गेला. अनेक ज्यूंनी ख्रिश्चन होण्यापेक्षा आत्महत्त्या करणे पसंत केले.
१५२१ - फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोचला.
१७८९ - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ,जॉर्ज सायमन ओह्म याचा जन्म.
१८७७ - इराणचा शाह,रझा शाह पेहलवी याचा जन्म.
१९२६ - रॉबर्ट गॉडार्डने पहिले द्रव-इंधनचालित रॉकेट प्रक्षेपित केले.
१९३९  -  इराणचा शहा मोहम्मद रझा शाह पेहलवी
याचा इजिप्तची राजकन्या फौझिया हिच्याशी निकाह.
१९४५ - ज्येष्ठ क्रांतिकारक,गणेश दामोदर उर्फ बाबाराव सावरकर यांचे निधन.स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते ज्येष्ठ बंधू होते. 
१९६३ - बाली बेटावरील माउंट अगुंग या ज्वालामुखीचा उद्रेक. ११,००० ठार.
१९८८ - इराकने हलाब्जा या कुर्दिस्तानमधील शहरावर विषारी वायुने हल्ला केला. हजारो मृत्युमुखी.
१९९५ - अमेरिकेच्या मिसिसिपी राज्याने अधिकृत रीत्या गुलामगिरीची प्रथा बेकायदा ठरवली.
१९९८ - दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ज्यूंचे शिरकाण सुरू असताना त्याविरुद्ध आवाज न उठवल्याबद्दल पोप जॉन पॉल दुसर्‍याने ख्रिश्चन धर्मीयांच्या वतीने जाहीर माफी मागितली.
२००७ - २००७च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने नेदरलँड्सच्या डान व्हान बुंगेच्या एका षटकात ६ षटकार मारले. हा विश्वचषक तसेच एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील उच्चांक आहे.

Monday, March 14, 2011

१८८३ -  समाजवादी विचारवंत व लेखक कार्ल मार्क्स,याचा मृत्यू.जागतिक राजकारणाला त्याच्या तत्त्वांमुळे एक वेगळा आयाम आणि कलाटणी प्राप्त झाली.
१८७९ - 'सापेक्षता सिद्धांता'चा जनक,जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांचा जर्मनीतील उल्म (रुटेनबर्ग) येथे जन्म.  
१८८९ - फर्डिनांड फोन झेपेलिनने 'बलून'चे पेटंट घेतले.
१९०० - 'गोल्ड स्टँडर्ड ऍक्ट' मंजूर झाल्यावर अमेरिकेचे चलन,अमेरिकन डॉलरची किंमत सोन्याशी निगडीत झाली.
१९३१ - पहिला भारतीय बोलपट 'आलम आरा' मुंबईमध्ये प्रदर्शित.
१९७८ - ऑपरेशन लिटानी - इस्रायेलच्या सैन्याने लेबेनॉनचा दक्षिण भाग बळकावला.
१९९४ - 'लिनक्स'ची १.० आवृत्ती प्रकाशित.
१९९८ - इराणमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप.
२०१० - 'देणाऱ्याने देत जावे' असे म्हणत रसिकांना भरभरून काव्यानंद देणारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांचे निधन.

Saturday, March 12, 2011


 १८८१ - तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष व समाजसुधारक मुस्तफा कमाल अतातुर्क(कमाल पाशा) यांचा जन्म.
१९१८ - रशियाने आपली राजधानी सेंट पीटर्सबर्गहून मॉस्कोला हलवली.
१९२८ - कॅलिफोर्नियातील सेंट फ्रांसिस धरण फुटून आलेल्या पुरात ४०० मृत्युमुखी.
१९३० - ब्रिटीश सरकारने भारतात तयार केलेल्या मीठावर लादलेल्या कराविरुद्ध महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरू केली.
१९३८ - जर्मनीचे सैन्य ऑस्ट्रियात घुसले.
१९४० - फिनलंडने सोवियेत संघाशी तह करून फिनिश कारेलिया देउन टाकले व आपले सैन्य व जनता तेथून हलवली.
१९६० - दक्षिण कोरियाच्या पुसान शहरातील रसायन कारखान्याला आग. ६८ ठार.
१९६७ - सुहार्तो इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१९६८ - मॉरिशसला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
१९९२ - मॉरिशस प्रजासत्ताक राष्ट्र झाले.
१९९३ - मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी.
१९९९ - चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड युरोपीय संघात दाखल.
२००६ - क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने केलेल्या ४३४ धावांना दक्षिण आफ्रिकेचे ९ बाद ४३८ असे उच्चांकी प्रत्युत्तर.

Friday, March 11, 2011

१६६५ - न्यूयॉर्कमध्ये प्रोटेस्टंट पंथीयांना धार्मिक अधिकार बहाल.
१७०२ - इंग्लंड मधील पहिले वृत्तपत्र 'डेली कौरंट' प्रथमच प्रकाशित झाले.
१७८४ - 'मेंगलोरच्या तहा'ने दुसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धाची सांगता.  
१८८६ - आनंदीबाई जोशी यांना अमेरिकेतील फिलाडेल्फिया विद्यापीठाची एम.डी.ही पदवी मिळाली.डॉक्टर होणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला.
१९१५ - भारताचे अव्वल दर्जाचे दमदार फलंदाज विजय हजारे यांचा जन्म.महाराष्ट्र,मध्य भारत,बडोद्यासाठी खेळलेल्या हजारे यांना भारतातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानले जाते.
१९५५ - अनेक गंभीर रोगांवर इलाज ठरलेल्या 'पेनिसिलीन' या क्रांतिकारक औषधाचा शोध लावणारे ब्रिटीश सूक्ष्मजंतू शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे निधन.
१९८२ - मिखाईल गोर्बाचेव्ह सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष झाले.
१९९२  - नौदलाचा सर्वात मोठा व अत्याधुनिक बहुपयोगी 'राजली' हा हवाईतळ राष्ट्राला अर्पण करून कार्यान्वित करण्यात आला.नौदलाचा हा चौथा हवाईतळ असून तो मद्रास येथून ८० किमी.वर आहे.
१९९९ - 'नॅस्डॅक' मध्ये नोंदणी होणारी 'इन्फोसिस'ही पहिली भारतीय कंपनी ठरली.
२००१ - कसोटी क्रिकेटमध्ये पहिली हॅटट्रिक करणारा भारतीय गोलंदाज बनण्याचा बहुमान हरभजन सिंगने मिळवला.

Thursday, March 10, 2011

जागतिक मूत्रपिंड दिन.
१८४९ - अब्राहम लिंकन यांचा पेटंट साठी अर्ज; अमेरिकन राष्ट्रपतींचा पहिलाच असा अर्ज.
१८६२ - अमेरिकेत सर्वप्रथम कागदी चलनांची अर्थात नोटांची सुरूवात.
१८७६ - पहिला दूरध्वनी संपर्क (अलेक्झांडर ग्रॅहम बेलने थॉमस वॅटसनशी संपर्क साधला).
१८९७ - थोर समाजसुधारक,क्रांतीज्योती,महिला मुक्तीच्या उद्गात्या सावित्रीबाई फुले यांचे निधन.
१९५९ - नामवंत कायदेपंडित,कायदेमंडळाच्या राजकारणातील पं.मोतीलाल नेहरूंचे सहकारी असणारे प्रभावी नेते व पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर मुकुंदराव रामराव जयकर यांचे निधन.
१९७७ - अंतराळशास्त्रज्ञांनी 'युरेनस' ग्रहाभोवतालच्या कड्यांचा शोध लावला. 
१९९४ - सातारा येथील श्री.सुभाष सासणे यांनी एका तासात दोरीवरील ९९७७ उड्या मारून जागतिक विक्रम केला.

Wednesday, March 9, 2011

१८८८ - जर्मनीचा सम्राट,कैसर विल्यम पहिला याचा मृत्यू.
१९३३ - सोविएत रशियाचा अंतराळवीर,अंतरिक्षात जाणारा पहिला माणूस,युरी गागारीन याचा जन्म. 

पहिलीवहिली बार्बी!!

१९४३ - जगप्रसिद्ध बुद्धिबळपटू बॉबी फिशर याचा जन्म. 
१९५९ - बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात.
१९८२ - सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या एकाच बाजूला असण्याचा अपूर्व योग.
१९८६ - 'व्हेगा-२' या मानवविरहीत रशियन अंतराळ याने  हॅलेच्या धूमकेतूची छायाचित्रे घेतली.
१९९२ - इस्रायेलचा माजी पंतप्रधान मेनाकेम बेगिन,याचा मृत्यू.
२००६ - एन्सेलाडस या शनीच्या चंद्रावर द्रवरुपात पाणी असल्याचा शोध लागला.
२०१० - लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण देणाऱ्या ऐतिहासिक महिला विधेयकाला राज्यसभेने १८५ विरुद्ध एक अशा बहुमताने मंजुरी दिली.

Tuesday, March 8, 2011

१६१८ - योहान्स केप्लरने ग्रहभ्रमणाचा तिसरा नियम शोधला.
१९११ - आंतरराष्ट्रीय महिला दिन पहिल्यांदा मानला गेला.
१९१८ - जुन्या पिढीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती गोवर्धन पारीख यांचा जन्म.एम.एन.रॉय यांच्या 'Radical Humanist' चळवळीतील अग्रणी,'स्त्री हितकारीणी'च्या संस्थापिका आणि विचारवंत   म्हणूनही त्या सर्वपरिचित होत्या.
१९३० - प्रसिद्ध कवी,लेखक व नाटककार चिं.त्र्यं.खानोलकर यांचा जन्म.'आरती प्रभू' या नावाने त्यांनी काव्यलेखन केले.
१९४८ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की सरकारी शाळांमधून धर्माचे शिक्षण देणे अमेरिकेच्या संविधानाच्या विरुद्ध आहे.
             महाराष्ट्रातील फलटण हे संस्थान भारतीय गणराज्यात सामील झाले.
१९५० - सोवियेत संघाने आपल्याकडे अणुबॉम्ब असल्याचे जाहीर केले.
२००२ - कर्नाटक संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायक आणि व्हायोलिनवादक डॉ.एम.बालमुरलीकृष्णन यांना एस.व्ही.नारायणस्वामी राव स्मृती राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
२००४ - 'लिक्विड क्रिस्टल' संबंधीच्या संशोधनाचे प्रणेते प्रा.एस.चंद्रशेखर यांचे निधन.बंगळूरमध्ये 'सेंटर फॉर  लिक्विड क्रिस्टल रिसर्च' या संस्थेच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
२००८ - भारताचा Grand  master विश्वनाथन आनंद याने मोरेलिया-लिनारेस बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. 

Thursday, March 3, 2011

१७०७ -  मोगल सम्राट  औरंगझेब, याचा मृत्यू.
१८३९ -  भारतीय उद्योगपती सर जमशेटजी टाटा यांचा जन्म.
१८४७ -  दूरध्वनीचा महत्त्वपूर्ण शोध लावणारा स्कॉटिश संशोधक अलेक्झांडर ग्रॅहाम बेल,याचा जन्म.
१९०४ - जर्मनीचा सम्राट कैसर विल्यम दुसर्‍याचा आवाज प्रथम मुद्रित केला गेला.
१९१८ - पहिले महायुद्ध - ब्रेस्ट-लिटोव्हीस्कचा तह - युद्धातील रशियाचा सहभाग समाप्त. फिनलंड, लाटव्हिया ,एस्टोनिया, पोलंड व लिथुआनियाच्या स्वतंत्र अस्तित्त्वाला  मान्यता.
१९३१ - अमेरिकेने स्टार स्पँगल्ड बॅनर या गीतास राष्ट्रगीताचा दर्जा दिला.
१९३८ - सौदी अरेबियात खनिज तेल सापडले. 
१९७३ - भारताच्या ओरिसा राज्यात राष्ट्रपती राजवट.
१९९५ - सोमालियातून संयुक्त राष्ट्रांचे शांतिदल बाहेर पडले.

Tuesday, March 1, 2011

जागतिक नागरी संरक्षण दिन
१५६५ - ब्राझिलमध्ये रियो दि जानेरो शहराची स्थापना.
१८०३ - ओहायो अमेरिकेचे १७वे राज्य झाले.
१८७२ - यलोस्टोन नॅशनल पार्क(अमेरिका) जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान झाले.
१८७३ - ई. रेमिंग्टन अँड सन्सनी पहिले टंकलेखन यंत्र विकण्यास सुरूवात केली.
१८९६ - हेन्री बेकरेलने किरणोत्सर्गाचा शोध लावला.
१९०७- Tata Iron And Steel Company (टिस्को) या उद्योगाची जमशेदपूर येथे स्थापना.
         भारताच्या पोलाद उद्योगाचा आणि पर्यायाने औद्योगिकीकरणाचा पाया घालणाऱ्या या कारखान्याची स्थापना सर दोराबजी टाटा यांनी केली.
१९१२ - आल्बर्ट बेरी हा विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारणारा सर्वप्रथम व्यक्ति ठरला.
१९५३ - जोसेफ स्टालिनला पक्षाघाताचा झटका.
१९६१ - अमेरिकेत शांती दलाची स्थापना.
१९९८ - ज्येष्ठ गायिका एम.एस.सुब्बलक्ष्मी आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना 'भारतरत्न'हा  देशातील  सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान. 
२००३-  सुप्रसिद्ध मराठी लेखिका गौरी देशपांडे यांचा मृत्यू. 
          'एकेक पान गळावया','तेरुओ आणि काही दूरपर्यंत','गोफ' यांसारख्या त्यांच्या साहित्यकृती  मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरल्या.