Monday, January 31, 2011


  • १८८४ - जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीचा पहिला खंड प्रकाशित झाला.
  • १९२४- ब्रिटनची सोविएत रशियाला मान्यता.
  • १९३१- रशियन संघराज्याचे पहिले राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्स्तीन यांचा जन्म.
  • २००३- 'कोलंबिया' या अवकाशयानाच्या स्फोटात भारतीय वंशाच्या कल्पना चावला सह सर्व सात अवकाशवीर मृत्युमुखी.

Sunday, January 30, 2011



 

८८५ - विख्यात रशियन नर्तिका,एना पावलोव हिचा जन्म.
१९१५ - पहिले महायुद्ध - जर्मनीने रशियाच्या सैन्याविरुद्ध विषारी वायुचा उपयोग केला.
१९२९ - सोवियेत संघाने लिओन ट्रोट्स्कीला हद्दपार केले.
१९३१ -  ज्येष्ठ संगीतकार गंगाधर महांबरे,यांचा जन्म.
१९५० - राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.
१९५८ - अमेरिकेच्या पहिला कृत्रिम उपग्रह एक्स्प्लोरर १ ने पृथ्वीप्रदक्षिणा सुरू केली.
१९७१ - अपोलो १४ चंद्राकडे निघाले.
१९९६ - अतिरेक्यांनी श्रीलंकेत कोलंबोमध्ये स्फोटके भरलेला ट्रक मध्यवर्ती बँकेच्या दारावर उडवला. ८६ ठार. १,४०० जखमी.
२००४ -  ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री सुरैय्या यांचा मृत्यू.

Friday, January 28, 2011


  • १७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले. हिकीज बेंगाल गॅझेट नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरुवात.
  • १९६३ - अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट,याचा मृत्यू. 
  • २००२ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुश यांनी  इराण, इराक व उत्तर कोरिया ही दुष्टतेच्या अक्षात (ऍक्सिस ऑफ इव्हिल) सामील असलेली राष्ट्रे असल्याचे जाहीर केले.

Thursday, January 27, 2011


  • १८५९ - आधुनिक जर्मनीचा शिल्पकार कैसर विल्यम  दुसरा,याचा जन्म. 
  • १८८० - थॉमस अल्वा एडिसनने विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतलं.
  • १९२६ - जॉन लोगीबेअर्डने प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले.
  • १९७३ - १९७३चा पॅरिसचा तह. व्हियेतनाम युद्ध अधिकृतरीत्या समाप्त

    • १९८३ - जगातील सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा (५३.९०० किमी) जपानच्या होन्शु व होक्काइडो बेटांमध्ये खुला.

    Tuesday, January 25, 2011


    • १८८१ - थॉमस अल्वा एडिसन व अलेक्झांडर ग्रॅहाम बेलनी ओरियेंटल टेलिफोन कंपनी सुरू केली
    • १९१७ - डेन्मार्कने वेस्ट ईंडिझमधील आपला प्रदेश अमेरिकेला २५,००,००० अमेरिकन डॉलरला विकला.
    • १९१९ - पहिल्या महायुद्धाच्या अंतानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना.
    • १९२४ - फ्रांसच्या शामोनि शहरात पहिले हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
    • १९४२ - दुसरे महायुद्ध - थायलंडने युनायटेड किंग्डम व अमेरिके विरूद्ध युद्ध पुकारले.
    • १९४९ - डेव्हिड बेन गुरियन इस्रायेलच्या पंतप्रधानपदी.
    • १९५५ - रशियाने जर्मनी विरूद्धचे युद्ध अधिकृतरित्या संपल्याची घोषणा केली.
    • १९६९ - अमेरिका व उत्तर व्हियेतनाम दरम्यान पॅरिसमध्ये तहाची बोलणी सुरू.
    • १९७१ - हिमाचल प्रदेशला भारताचे १८वे राज्य म्हणून मान्यता.
    • १९७१ - युगांडात इदी अमीन ने मिल्टन ओबोटेला पदच्युत केले व स्वतःला अध्यक्ष घोषित केले.
    • १९९९ - पश्चिम कोलंबियात भूकंप. १,००० ठार.
    • २००१ - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवाझ उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.
    • २००३ - सेरेना विल्यम्सने बहीण व्हिनस विल्यम्सला हरवून ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले.
    • २००४ - लेखिका अमृता प्रीतम, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि माजी सरन्यायाधीश एम.एन. वेंकटचलय्या यांना पद्म विभूषण किताब जाहीर. तसेच दिग्दर्शक गुलजार, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, जपानचे पंतप्रधान योशिरो मोरी, पत्रकार एम.व्ही. कामत, व्हायोलिनवादक एन. राजम यांना पद्मभूषण किताब जाहीर.



    Monday, January 24, 2011


    • राष्ट्रीय बालिका दिवस.
    • १९०८ -रॉबर्ट बाडेन-पॉवेलने बॉय स्काउट्स सुरू केले.
    • १९२४ -सेंट पीटर्सबर्गचे नाव बदलून लेनिनग्राड करण्यात आले.
    • १९३६ -आल्बेर सराउ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
    • १९४३ -दुसरे महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट व इंग्लिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी कॅसा ब्लांका येथील परिषद आटोपली.
    • १९४५ -दुसरे महायुद्ध - रशियन सैन्याने ऑश्विझ कॉन्सेन्ट्रेशन कॅम्प मुक्त केला.
    • १९६६ -एर इंडियाचे बोईंग ७०७ जातीचे विमान युरोपमधील मोंट ब्लांक या सर्वोच्च शिखरावर कोसळले. ११७ ठार. मृतांत ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ होमी भाभा.
    • १९७२ -गुआममध्ये इ.स. १९४४पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. याकोइला दुसरे महायुद्ध संपलेले माहिती नव्हते.
    • १९८६ - अंतराळयान व्होयेजर २ युरेनसपासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले.
    • १९८७ - लेबेनॉनमध्ये अतिरेक्यांनी अलान स्टीन, जेसी टर्नर, रॉबर्ट पॉलहिल व मिथिलेश्वर सिंग यांचे अपहरण केले.
    • २०११ - ज्येष्ठ हिंदुस्तानी शास्त्रीय गायक  भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे निधन.

    [संपादन]

    Thursday, January 20, 2011


    • १८९४ - माधव ज्युलियन, मराठी कवी, कोशकार यांचा जन्म.
    • १९२४ - प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते यांचा जन्म.
    • १९४५ - रासबिहारी बोस, स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक नेते यांचा मृत्यू.
    • १९५४ - नॉटिलस या अणुउर्जेवर चालण्या-या जगातील पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.
    • १९७२ - मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
    • १९९९ - जर्मन सरकारच्या 'फोरम ऑफ आर्ट ऍंड एक्झिबिशन' ने १९९९ च्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी विख्यात सतारवादक पं. रवी शंकर यांची निवड केली.
    • २००० - 'फायर ऍंड फरगेट' या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताकडून यशस्वी चाचणी.
    • २००३ - राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अपमान करणा-यांना अधिक कठोर शिक्षा करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.

    Wednesday, January 19, 2011

    • १२६५- इंग्लंड च्या संसदेची पहिली बैठक.
    • १९२१- तुर्कस्तानचे पहिले संविधान अस्तित्त्वात आले.
    • १९३०- क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन.
    • १९४२- दुसरे महायुद्ध- बर्लिन मधील वॉन्सी परिषदेत नाझींनी ज्यूंच्या प्रश्नाचा शेवटचा उपाय                                                  ठरवला.
    • १९४४ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने बर्लिन वर २,३०० टन बॉम्ब फेकले.
    • १९४५ - दुसरे महायुद्ध - हंगेरीने दोस्त राष्ट्रांशी शस्त्रसंधी केली.
    • १९९९- ज्येष्ठ नाटककार,दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार   जाहीर.
    • २००१- अमेरिकेचे ४३वे अध्यक्ष म्हणून जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी पदभार स्वीकारला.
    • २००९- जगभरातील जनतेला 'वुई कॅन चेंज'हे स्वप्न दाखवणारे बराक ओबामा यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली.

    Thursday, January 6, 2011

    • पत्रकार दिन
    • १६६५-महाबळेश्वरच्या मंदिरात शिवाजी महाराजांनी जिजाबाई व जुने मुत्सद्दी सोनोपंत  डबीर यांची सुवर्णतुला केली.
    • १८३२-बाळशास्त्री जांभेकर संपादित  'दर्पण' या मराठीतील पहिल्या वृत्तपत्राचे प्रकाशन.
    • १९०७-शिक्षण क्षेत्रातील प्रातःस्मरणीय नाव,मारिया मोन्तेसरी यांनी रोम येथे स्वतःची पहिली शाळा व पाळणाघर उघडले.
    • १९२४-स्वा. वि.दा.सावरकर यांची काळ्या पाण्याच्या शिक्षेतून मुक्तता.
    • १९२८-ज्येष्ठ नाटककार विजय तेंडूलकर यांचा जन्म.
    • १९५९-भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव याचा जन्म.
    • १९६६-सुप्रसिद्ध संगीतकार,ऑस्कर विजेता ए.आर.रेहमान याचा जन्म.